मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

तुकारामगाथा ११०१ - १२००

तुकारामगाथा ११०१ - १२००

1101 जालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गा वोळल्या म्हैसी ॥1 राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥ स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥2॥ तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥3

1102 अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥1 रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥ कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवाणी ॥2॥ तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥3॥ नाम जपें बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥4॥ नामजप जीवन मुनिजना ॥ तुकयास्वामी रघुनंदना ॥5

1103 मी तों अल्प मतिहीन । काय वर्णू तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥1 नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥2॥ शिळा होती मनुष्य जाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥3 राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥4

श्लोकरूपी अभंग

1104 तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥1 नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका । मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥2 हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥3 भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी । असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ का4॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पायिं तो राख देवा । असें मागतसे तुझी चरणसेवा ॥5

1105 उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दक्षिणे मूख वाहे । महापातकांसी पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥1 गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । लागलें मुनिवरां गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥2 ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा द्यावयासी उदार । जया वोळगती सिद्धी सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठा3 असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हें धरुनि भक्तीलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली हे सिद्धसाधकांची ॥4 करा वेगु हा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तें च साधीं । म्हणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥5

1106 धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं । मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी तें तृप्त नाहीं ॥1 न दिसे शुद्ध पाहातां निजमती । पुढें पडिलों इंद्रियां थोर घातीं । जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडीं ॥2 असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता । क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥3 निज देखतां निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभयीभीत आहे । तयां विस्त देहीं नको देउं देवा । तुजवांचुनी आणिक नास्ति हेवा ॥4 करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ति दूरी । नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥5

1107 पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुबिऩलीं साजिरीं मोरवीसें । हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥1 जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥2 असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥3 कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली दैवांची जया चिंतितां अग्नि हा शांति नीवे । धरा मानसीं आपला देहभावे4 मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय । देह मांडला भाव हा बापमाय तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥5

1108 असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नि हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥1 तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भक्षिता पालटे तें चि देहीं । तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥2 फळ कर्दळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये । धीर नाहीं त्यें वाउगें धीग जालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥3 असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें । असे बिंब तें या मळा आहे ठेलें । कैसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप । नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥4 करा वर्म ठावें नका सोंग वांयां । तुका वीनवीतो पडों काय पायां । तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥5

1109 मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥1 ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों । भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥2 जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये । करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥3

1110 सुटायाचा कांहीं पाहातों उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥1 ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धी बळ माझें ॥ध्रु.॥ प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥2॥ विधिनिषेधाचे सांपडलों चपे । एकें एक लोपे निवडेना ॥3॥ सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥4॥ तुका म्हणे आतां करीं सोडवण । सर्वशक्तीहीन जालों देवा ॥5

1111 भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥1 ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा म्हणउनी ॥ध्रु.॥ विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥2॥ तुका म्हणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥3

1112 येगा येगा पांडुरंगा । घे उचलुनि वोसंगा ॥1 ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥2॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥3॥ तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥4

1113 माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥1 कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ‍ कोंवळी ॥2॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥3

1114 म्ही उतरा । भाव निरोपूनि पायीं ॥1 तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥ आमचा हा नेम । तुम्हा उचित हा धर्म ॥2॥ तुका म्हणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥3

1115 केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥1 विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥ देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक म्हुण ॥2॥ तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥3

1116 विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥1 विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥ विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥2॥ भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥3॥ तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥4

1117 दास जालों हरिदासांचा । बुद्धीकायामनेंवाचा ॥1 तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंगकल्लोळ । नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरिकीर्त्तनीं ॥ध्रु.॥ ऐकतां हरिकथा । भिक्त लागे त्या अभक्ता 2॥ देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥3॥ हें सुख ब्रह्मादिकां । म्हणे नाहीं नाहीं तुका ॥4

1118 गति अधोगति मनाची युक्ती । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥1 जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥ मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥2॥ तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौर्‍यांशीचा ॥3

1119 पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥1 पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥ उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥2॥ पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥3॥ तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥4

1120 द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥1 गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥ वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥2॥ लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांटविलें ॥3॥ तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥4

1121 सुरवर येती तीर्था नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥1 साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥ पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥2॥ निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥3॥ तुका म्हणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घे कोटि ॥4

1122 विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥1 वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥ सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥2॥ नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥3

1123 देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥1 दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥2॥ तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥3

1124 कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥1 ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥ तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥2॥ देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥3॥ तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥4

1125 नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥1 विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥ तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥2॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां ते गुण न सरती ॥3॥ तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥4

1126 अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥1 घातले वचन न पडेचि खाली । तू आम्हा माउली अनाथांची ॥ध्रु.॥ मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥2 नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥3 तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥4

1127 उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥1 सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥ पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥2॥ चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥3॥ तुका म्हणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥4

1128 काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥1 मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥ होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥2॥ अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥3॥ तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपत्ति गोड देवा ॥4

1129 मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥1 तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥ करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥2॥ नव्हे साच कांहीं कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरिली ॥3॥ तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥4

1130 आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥1 सर्वभावें नाम गान आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥2॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥3॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका ह्मणे ॥4

1131 जनीं जनार्दन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हां1 जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥ पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥2॥ आम्हां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥3॥ तुका म्हणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥4

1132 यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥1 चोरा धरितां सांगे कुठो†याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥2॥ तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥3

1133 धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥1 सुखें करावें कीर्तन हर्षा गावे हरिचे गुण । वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥ जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥2॥ हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥3

1134 पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥1 सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥ पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥2॥ तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥3

1135 दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥1 हें चि वर्म आम्हा भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥ लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येर्‍हवी तें ओझें कोण वाहे ॥2॥ तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥3

1136 वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥1 करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥2॥ तुका म्हणे बळी । ते चि एक भूमंडळीं ॥3

1137 ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥1 मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धीसिद्धी म्हणियारीं ॥2॥ सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हा चि करिती पुराणें ॥3॥ ब्राह्मण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥4॥ तुका म्हणे अनुभवें आम्ही पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥5

1138 न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥1 अविनाश सुख देल निर्वाणी । चुकतील खाणी चौर्‍यांशीच्या ॥ध्रु.॥ आणिकिया जीवां होल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥2॥ आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥3॥ तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील॥4

1139 कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥1 मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥ आणीक ही भोग आणिकां इंद्रियांचे । नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥2॥ रूप दृष्टी धाय पाहातां पाहातां । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥3॥ तुका म्हणे कां रे नाशिवंतासाटीं । देवासवें तुटी करितोसी ॥4

1140 बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देल तो अन्नवस्त्रदाता ॥1 काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥ दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥2॥ न लगे मागणें सांगणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥3॥ तुका म्हणे ले अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥4

1141 सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥1 काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु.॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥2॥ तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥3

सेतावर - अभंग

1142 सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥1 नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥ जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥2॥ कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥3ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥4॥ बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥5॥ नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोर्‍याच्या नेटें ॥6॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥7॥ सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥8॥ प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥9॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥10

1143 वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥1 तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥ चोरासवें वाट ॥ चालोनि केलें तळपट ॥ 2॥ डोळे झांकुनि राती ॥ कूर्पी पडे दिवसा जोती ॥3॥ पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥4॥ फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥5

1144 सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥1 सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥ गोफणेसी गुंडा घालीं पागोर्‍याच्या नेटें । पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥2॥ पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुद्धी व्हावीं दोनी ॥3॥ खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग दे त्यासी ॥4 तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥5

1145 नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥1 नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥2॥ तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥3

उतराधिपदें - 22

1146 क्या गाऊं को सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥1 खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥ काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऐसी लोक बिराणी ॥2॥ गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ॥3

1147 छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥1 तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥ तुलसीमाला बभूत चढावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥2॥ कहे तुका जो सा हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥3

1148 मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥1 राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥ अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥2॥ कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥3

1149 चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥1 काहे बडा दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा तेरा खव हि ॥ध्रु.॥ और बात सुन उखळसुं गळा । बांधलिया आपना तूं गोपाळा ॥2॥ फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥3

1150 हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥1 मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥ हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥2॥ देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥3

1151 क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥1 क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥ किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥2॥ कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥3

1152 कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥1 जग रडे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदमाहि पैठा ॥ध्रु.॥ भला पाऊं जनम इन्हे बेर । बस मायाके असंग फेर ॥2॥ कहे तुका धन मानहि दारा । वोहिलिये गुंडलीयें पसारा ॥3

1153 दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥1 प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥ आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥2॥ तुका प्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥3

1154 ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥ इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥1॥ अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥2॥ तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥3

1155 मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥1॥ जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥2॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥3

1156 आपे तरे त्याकी कोण बरा । औरनकुं भलो नाम घरा ॥ध्रु.॥ काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥1॥ बरसतें मेघ फलतेंहें बिरखा । कोन काम अपनी उन्होति रखा ॥2॥ काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥3॥ काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥4॥ कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥5

1157 जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥ नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥1॥ उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥2॥ देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥3

1158 भले रे भा जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥ फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥1॥ तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥2॥ कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥3

1159 लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥ कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥1॥ नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥2॥ और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥3

1160 राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंब न पा ॥ध्रु.॥ कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥1॥ कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥2॥ कहे तुका सब हि चेलहार । एकारामविन नहिं वासार ॥3

--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--

1161 काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ध्रु.॥ राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥1॥ माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥2॥ राना रंग डोंगरकी रा । कहे तुका करे इलाहि ॥3

1162 काहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥ध्रु.॥ केते मालुम नहिं पडे । नन्हे बडे गये सो ॥1॥ बाप भा लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥2॥ काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥3

1163 क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुम्हारा ॥ध्रु.॥ तनजोबनकी कोन बरा । ब्याधपीडादि स काटहि खा1॥ कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥2॥ कहे तुका नहिं समज्यात मात । तुम्हारे शरन हे जोडहि हात ॥3

1164 देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥ मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥1॥ कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥2॥ कहे तुका वो संन्यास । छोडे आस तनकी हि ॥3

1165 रामभजन सब सार मिठा । हरि संताप जनमदुख रा ॥ध्रु.॥ दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥1॥ खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥2॥ कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥3

1166 बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥ ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥1॥ रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥2॥ कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥3

1167 हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दि लंका ॥ध्रु.॥ गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥1॥ वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥2 स्तंभ फोड पेट चिरीया कश्यपका । प्रल्हाद के लियें कहे भा तुकयाका ॥3

साख्या 30

1168 तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥1

1169 रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज । बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥1

1170 लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम । माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥1

1171 तुका पंखिबहिरन मानुं । बो जनावर बाग । असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥1

1172 तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर । तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥1

1173 संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार । चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥1

1174 तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम । बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥1

1175 राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड । हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥1

1176 राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख । आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥1

1177 कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार । मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥1

1178 तुका दास तिनका रे । रामभजन निरास । क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥1

1179 तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख । पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥1

1180 कहे तुका जग भुला रे । कह्य न मानत कोय । हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥1

1181 तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये । चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥1

1182 तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये । एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥1

1183 तुका मा†या पेटका । और न जाने कोये । जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥1

1184 काफर सोही आपण बुझे । आला दुनियां भर । कहे तुका तुम्हें सुनो रे भा । हिरिदा जिन्होका कठोर ॥1

1185 भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये । निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥1

1186 फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥1

1187 तुका दास रामका । मनमे एक हि भाव । तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥1

1188 तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात । धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥1

1189 चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये । तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥1

1190 चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग । पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥1

1191 तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये । दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥1

1192 तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय । उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बरा1

1193 तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय । जबथे इच्छा नहिं मु । तब तूं किया काय ॥1

1194 तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक । मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥1

1195 ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास । सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥1

1196 कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास । क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥1

1197 तुका और मिठाक्या करूं रे । पाले विकारपिंड । राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥1              

1198 म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥1 लाहो घे हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥ गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि म्हणसी ॥2॥ पुरलासाटीं देहाडा । ऐसें न म्हणे म्हणे मूढा ॥3॥ नरदेह दुबळा । ऐसें न म्हणे रे चांडाळा ॥4॥ तुका म्हणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥5

1199 संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दीकांचे काम नाहीं येथें ॥1 बहु धड जरी जाली म्हैस गाय । तरी होल काय कामधेनु ॥2॥ तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येल कळों ॥3

1200 नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥1॥ नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥1॥ तुका म्हणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥3

--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.