सोमवार, २४ एप्रिल, २०१७

तुकारामगाथा 101 to 200



तुकारामगाथा


101 आतां तरी पुढें हा चि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥1 सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥2 तुका ह्मणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥3


102 क्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥1 शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥ देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥2 तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥3


103 विश्वाचा जनिता । ह्मणे यशोदेसि माता ॥1 ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥ निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥2 तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥3


104 काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा ॥1 कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥ आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥2 तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥3


105 जेवितां ही घरी । नाक हागतिया परी ॥1 ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥ सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥2 तुका ह्मणे करी । ताका दुधा एक सरी ॥3


106 हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥1 कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥ फोडावें मडकें । मेलें लेखीं घायें एकें ॥2 तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥3


107 व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥1 कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥ कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मिळण वरी ॥2 तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥3


108 जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥1 येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥ प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥2 तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥3


109 मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥1 हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥2 आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥3


110 थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालिया ॥1 हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥ अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥2 तुका ह्मणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥3


111 आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि ॥1 मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥2 तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥3


112 न करीं संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥1 या नांवें अद्वैत खरें ब्रह्मज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥ इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥2 तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥3


113 पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥1 ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥ आहेति सकळ । तीर्था काळें देती फळ ॥2 तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥3


114 तीर्था धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥1 मिळालिया संतसंग । समपिऩतां भलें अंग ॥ध्रु.॥ तीर्था भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥2 तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥3


115 घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो ॥1 भक्ताराखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥ अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥2 तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥3


116 देखोनि पुराणिकांची दाढी । रडे काढूनी नाक ओढी ॥1 प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥ आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥2 बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥3 दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥4 मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥5 होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥6 तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥7


117 दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥1 अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥2 दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥3 दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥4 तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥5


118 अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥1 वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥2


119 शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धी नाहीं स्थिर 1 त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥ संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥2 तुका ह्मणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥3


120 चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥1 शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होइऩल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥ तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । ह्मणऊनि चिंता उपजली ॥2


121 मांडवाच्या दारा । पुढें आणिला ह्मातारा ॥1 ह्मणे नवरी आणा रांड । जाळा नवर्‍याचे तोंड ॥ध्रु.॥ समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥2 तुका ह्मणे खरा । येथूनिया दूर करा ॥3


122 कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥ वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥1 त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥ अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥ पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥2 पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥3 कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥ यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥4 तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरूनी । गेलीं ह्मणतां मी माझें ॥5


123 कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥1 गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥2 आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥3


124 हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥1 एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥ भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥2 उजवें वामांग । तुका म्हणे एकचि अंग ॥3


125 वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥1 शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥ पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥2 वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥3 सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥4 सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका ह्मणे जाण । तुह्मी संत तदथाअ ॥5


126 घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥1 नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥2 तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥3


जोहार - अभंग 3


127 मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥1 मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥ फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥2  आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥3 तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥4


128 येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥1 जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥2 तुका म्हणे उद्यां लावीन म्हनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥3


129 देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥1 धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥ वघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥2 सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥3 घराकडे पाहूं नयेसें चि जालें । अमानत केलें दिवाणांत ॥4 आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥5


130 शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ॥1 उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥ त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें 2 तुका म्हणे करी बहुच तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥3


131 बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥1 वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याइऩ जीवें नाश पावे ॥ध्रु.॥ निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरि आंत चरे ॥2 तुका म्हणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥3


132 माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥1 काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥ शुकें निळकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥2 तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥3


133  हरि तूं निष्ठ‍ निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥1 घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥ नळा दमयंतीचा योग । बिघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥2 राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥3 कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥4 बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥5 श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥6 तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं पुढती। तुका म्हणे करिसी तें ॥7


134 चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥1 तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥ पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥2 केलीं मागें नको राहों । तुज मान आम्ही आहों ॥3 करीं तुज जीं करवती । आणिक नामें घेऊं किती ॥4 तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥5


135 बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निपराध ॥1 जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥ साकरेसि ह्मणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥2 तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥3


136 चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥1 प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥2 तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥3


137 काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥1 अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥2 तुका म्हणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥3


138 शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥1 दुष्ट बुद्धी चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥2 तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥3


काला चेंडुफळी - अभंग 100


139 झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥1 त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥ आगळा होऊनि धरी वरिचिया वरी । चपळ तो जिंके गांढ ठके येरझारीं ॥2 हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥3 डाइप पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥4 तुका म्हणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥5


140 अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥1 मोकळा होतासि कां रे पडिलासि डाइप । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥ मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कविळलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥2 तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥3 सांडितां ठाव पुढें साईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥4 तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥5


कोडें - अभंग 2


141 कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥1 पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई ॥ रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥ध्रु.॥ सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें ज्यवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥2 तुका म्हणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥3


142 नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई 1 आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥ कमास मोल येथें नका रीस मानू । निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥2 तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥3


143 हारस आनंदाचा । घोष करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥1 पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥ काय पाहातां हे भा । हरुषें नाचा धरा घा । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥2 जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय कळीकाळ तें बापुडें ॥3




144 अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला । नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥1 घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं । ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥ एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा । एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥2 एकीं स्थिराविल्या गारे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेत एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥3 एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें । गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥4 एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें जैसें होतें शिळें संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥5 एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धी रे केला अवघ्यां वाखा ॥6 तुका म्हणे आतां कान्होबा आम्हा वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हापाशीं तें तुज अवघेंचि ठावें मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥7


145 बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥1 पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥ बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥2 तुका ह्मणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा वाटों नेदी विषम ॥3


146 आह्मां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥1 पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥ खेळ खेळे न पडे डा । ज्याचा भार त्याच्या ठायीं । कोणी पडतील डा । कोणी कोडीं उगवीती ॥2 तुका म्हणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचें बळ । त्यांसि तैसा विभाग ॥3


147 काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्‍या1 देती आपुलाला झाडा । गा बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकडएाचा हरि मेळीं ॥ध्रु.॥ आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥2 भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥3 मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥4 एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रह्मानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥5



 148 यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी । अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥1 म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥ एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे । ह्मणती गोड जालें । ह्मणती गोड जालें । आणिक दे । नाहीं पोट धालें ॥2 हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया । देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥3 म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या । अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥4 एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां । येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥5 आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे । वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥6 करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे । एक एकाचें च्छष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥7 नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखेंचि हरी । म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकांसवें ॥8 गा विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें । देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य ह्मणती गोपाळ । धिग जालों आम्ही 9 म्हणती कैसें करावें । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया । सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिकची होंट । मटमटां वाजवी ॥10 आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी । ह्मणती जाणे जीवीचें । ह्मणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥11 धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें । मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥12 तुझा संग बरवा । नित्य आह्मां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें । तंव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळीं । गा चारावया ॥13 तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गा गोपाळांसि केली । आपण यांसरी । आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आम्हांसहित ॥14


149 या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥1 वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥ उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हेचि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥2 निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाट ॥3 कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥4 एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवेंरूपें केल्या तन्मय ॥5





फुगडी - अभंग 2


150 फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥1 फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥ मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥2 त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥3 आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥4 तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥5


151 फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि ॥1 फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥ हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळिता लागे माती ॥2 सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥3 सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥4 तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥5


लखोटा - अभंग 1


152 लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥1 हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥2 अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥3 बैस भावा पाठीं। ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥4 पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥5 आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥6 नामा केलें खरें । आपुलें म्या बरें । तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥7


हुंबरी - अभंग 1


153 तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥ सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥1 चेंडुवा सवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥2 अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥3 रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥4 जाणो तो ठावा आहेसि आह्मां । तुवां आपुला मामा मारियेला ॥5 याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥6


हमामा - अभंग 2


154 मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥1 पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥ मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥2 तरीच मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥3 मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥4  मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥5 आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥6 तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥7

 

155 हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्‍यांशीची ॥1 पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाडी पडिलें आपणची ॥ध्रु.॥ दुसर्‍या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें । दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥2 तिसर्‍या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोस सोस करितां डाडीपडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥3 चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुर्‍यापाटिलाचा पोर यम । त्याचे पडलीस डाडी4 हमामा घालितां भ्याला तुका त्यानें सांडिली गड्याची सो । यादवांचा मूल एक विठोबा त्यासवें चारितो गा5


गा- अभंग 1


156 आह्मां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥1 वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥ वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥2 चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥3 तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥4


कांडण - अभंग 2


157 सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धी गे ॥1 आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥ सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमिळणी जंव मिळें ॥2 एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥3 सरलें कांडण पाकसिद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥4 उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥5 तुका म्हणे मज माहेरीं आवडी । ह्मणोनि तांतडी मूळ केलें ॥6


158 सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥1 मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थिरीं घाव घालीं ॥ध्रु.॥ वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥2 कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥3 तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥4


आडसण दळण - अभंग 1


159 शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥1 आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सिद्ध कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥ सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥2 सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दिळल्या जेवण जैसें तैसें ॥3 सुपीं तों चि संग घे धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥4 दिळतां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥5 सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे6


दळण - अभंग 1


160 शुद्ध दळणाचें सुख सांगों का । मानवित सबा तुज ॥1 शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥ शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥2 शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥3 तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥4


161 उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥1 वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥2 तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥3


162 याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥1 आजि देतों पोटभरी । पुरे ह्मणाल तोंवरी ॥ध्रु.॥ हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥2 तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥3


163 शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥1 तुह्मी व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥2 तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥3


164 पळाले ते भ्याड । त्यांसि येथें जाला नाड ॥1 धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥2 तुका लागे घ्यारे पायां । कैं पावाल या ठाया ॥3


165 धालें मग पोट । केला गड्यानी बोभाट ॥1 ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥ खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥2 तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥3


166 पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥1 म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥ त्याविण हे नासी नव्हे दुसरिया ऐसी ॥2 सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥3


167 आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥1 मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥ कोंडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥2 बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥3


168 गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥1 आह्मी न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥ न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥2 तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥3


हाल - अभंग 2


169 यमुनेतटीं मांडिला खेळ । ह्मणे गोपाळ गडियांसि ॥1 हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥ नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥2 तुका म्हणे कान्हो तिळतांदळिया । जिंके तो करी आपुला खेळिया ॥3


170 बळें डाइप न पडे हरी । बुद्धि  करी शाहणा तो ॥1 मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥2 तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥3



 
सुतुतू - अभंग

171 जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥1 घाली सुतुतू फिरोनि पाही आपुणासि । पाही बिळया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ध्रु.॥ खेळिया तो हाल सांभाळी । धुम घाली तो पडे पाताळीं ॥2 बिळया गांढ तो चि खेळे । दम पुरे तो वेळोवेळां खेळे ॥3 हातीं पडे तो चि ढांग । दम पुरे तो खेळिया चांग ॥4 मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तो चि आधार फिके ॥5 आपल्या बळें खळे रे भा । गडियाची सांडोनि सो6 तुका म्हणे मी खेळिया नव्हें । जिकडे पडें त्याचि सवें ॥7


172 अनंत ब्रह्मांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥1 नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥2 विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥3 तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रह्मचारी ॥4


173 कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥1 होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥ प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥2 तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥3


174 मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥1 चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी । वेळ लावियेला अझुणी। एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥ वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥2 अवघाचि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥3 घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥4 रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥5 बोलों नेदी म्हणे स्थीर । खुणा दावी खा रे क्षीर ॥6


175 धन्य त्या गौळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥1 अरे कृष्णा इंद्र अमर च्छती । कोण तयांप्रति येइल आतां ॥2 तुका म्हणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासों लागे ॥3


176 तुह्मी गोपी बाळा मज कैशा नेणा । इंद्र अमरराणा म्यां चि केला ॥1 इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ध्रु.॥ मजपासूनिया जाले जीव शिव । देवांचा ही देव मी च कृष्ण ॥2 तुका म्हणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलों ॥3


177 कां रे गमाविल्या गा । आली वळती तुझी जा । मागें जालें का । एका तें का नेणसी ॥1 केलास फजित । मागें पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ध्रु.॥ वोला खोडा खिळ गाढी । ऐसा कोण तये काढी । धांवेल का पाडी । तुझी आधीं वोढाळा ॥2 चाल धांवें । मी ही येतों तुजसवें । तुका म्हणे जंव । तेथें नाहीं पावली ॥3


178 काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥1 काय देवा यांसि व्हावें उतरा। ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥ सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥2 तुका म्हणे वत्स धेनुचिया चित्तीं । तैसें मज येती सांभाळित ॥3


179 कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥1 काला वांटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥ वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥2 तुका म्हणे भूमंडळीं । आह्मी बळी वीर गाडे ॥3


180 कवळाचिया सुखें । परब्रह्म जालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥1  कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥2 काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवें तया । आह्मी ही सोंकलों ॥3


181 कान्होबा आतां तुह्मी आह्मी च गडे । कोणाकडे जाऊं नेदूं ॥1 वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदीं ॥ध्रु.॥ ढवळे गाचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारूं ॥2 तुका म्हणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥3


182 बहु काळीं बहु काळी । आह्मी देवाचीं गोवळीं ॥1 नाहीं विटों देत भात । जेऊं बेसवी सांगातें ॥ध्रु.॥ बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥2 तुका म्हणे नाहीं नाहीं । त्याचें आमचें सें कांहीं ॥3


183 बहु बरा बहु बरा । यासांगातें मिळे चारा ॥1 ह्मणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥ बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥2 पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥3


184 घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचें समाधान करी ॥1 ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ध्रु.॥ स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥2 मोहरी पांवा काठी । तुका म्हणे यांजसाठी ॥3


185 वळी गा धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥1 नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥ नेदी पडों उणें पुरें । ह्मणे अवघें चि बरें ॥2 तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥3


186 म्हणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥1 चाल चाल रे कान्होबा खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं गा जमा करूनि ॥ध्रु.॥ न लगे जावें घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हा2 तुका म्हणे धालें पोट । आतां कशाचा बोभाट । पाहाणें ते वाट । मागें पुढें राहिली ॥3


187 तुझिये संगति । जाली आमुची निश्चिंती 1 नाहीं देखिलें तें मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥ घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥2 तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥3


188 कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥1 तुझ्या राहिलों आधारें । जालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ तुझे लागलों संगती । आतां येतों काकुळती ॥2 तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥3





टिपरी - अभंग 7


189 खेळ मांडियेला वाळवंटीं घा । नाचती वैष्णव भा रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥1 नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घा पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥2 लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढजन नरनारी लोकां । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ॥3 वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥4 होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥5


190 एके घा खेळतां न पडसी डाइ । दुचाऑयाने ठकसील भा रे । त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सो रे ॥1 खेळ खेळोनियां निराळा चि राही । सांडी या विषयाची घा रे । तेणें चि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भा रे ॥ध्रु.॥ सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घा तेणें सतंतर फड जागविला रे । एक घाइप खेळतां तो न चुके चि कोठें । तया संत जन मानवले रे ॥2 ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला आपण भोंवतीं नाचती रे । सकिळकां मिळोनि एकी च घा । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायीं रे ॥3 रामा बसवंत कबिर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे । पांचा सवंगडियां एक चि घा तेथें नाद बरवा उमटला रे । ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो ही खेळ निवडिला रे ॥4 ब्राह्मणाचा पोर खेळिया एक भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मिळविला रे । एक चि घा खेळतां खेळतो । आपणचि बसवंत जाला रे ॥5 आणीक खेळिये होउनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सो रे । एकचि घाखेळतां जो चुकला । तो पडेल संसारडा रे ॥6


191 बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस पद राखों जेणें टिपरिया घा। अनुहातें वायें मांदळा रे ॥1 नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमा पाहूं रे ॥ध्रु.॥ सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । विसरती पक्षी चारा घेणें पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥2 आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानीं रे । आंधळ्यांसि डोळे पांगळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तारुण्यें रे ॥3



192 दोन्ही टिपरीं एकचि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एका छंदें रे ॥1 कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एकचि बसवंत अवघियां रे । सम विषम तेथें होऊंच नेदी । जाणऊनि आगिळया रे ॥ध्रु.॥ संत महंत सिद्ध खेळतील घा । तेच सांभाळी माझ्या भा रे । हात राखोन हाणिती टिपर्‍या । टिपरें मिळोनि जाय त्याची सो रे ॥2 विताळाचें अवघें जाल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे । निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घा रे ॥3 प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे नेणतीं नेणतींच एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥4 रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥5


193 या रे गडे हो धरूं घा जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं आपुलिया हिता ॥1 फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि सोनियाचा दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥ हिंडती रानोरान भुजंगांत कांट्यावन । सुख तयांहून आह्मां गातां नाचतां रे ॥2 तुका म्हणे ब्रह्मादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥3


194 भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचें नांव पंढरपुर रे । तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥1 नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देल विसावा रे । पुढें गेले ते निधा जाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ध्रु.॥ ळियां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळिकाळा रे । पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो जाला भवदुःखा वेगळा रे ॥2 संतसज्जनीं मांडिलीं दुकाने । जया जें पाहिजे तें आहे रे । भुक्तीमुक्ति फुकाच साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥3 दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे । न वजों ह्मणती आह्मी वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥4 बहुत दिस होती मज आस । आजि घडलें सायासीं रे । तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥5


195 पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे । टाळ टिपरी मांदळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥1 चला तें कवतुक भा रे । पाहों डोळां कामीं गुंतलेति का रे । भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसें सुख त्रिभुवनीं नाहीं रे ॥ध्रु.॥ आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे साही अठरा चारी घालुनियां घा । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥2 क्तीचीं भूषणें मुद्रा आभरणें । शोभती चंदनाच्या उटी रे । सत्व सुंदर कास घालूनि कुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥3 हरि हर ब्रह्मा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे । विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥4 वाणितील थोरी वैकुंठिचीं परी । न पवे पंढरीची सरी रे । तुकयाचा दास म्हणे नका आळस करूं । सांगतों नरनारींस रे ॥5


196 ब्रह्मादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरिली ॥1 मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाइऩचे ॥ध्रु.॥ उचिष्ट न लभे देवा । तें हें सदैवां गोवळ्या2 तुका म्हणे जोड जाली । ते हे माउली आमुची ॥3


197 कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाट । बोलोनियां खोटें ॥1 परि तूं न संडिसी खोडी । करिसी 
केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आह्मांसी ॥ध्रु.॥ तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥2 जरी तुझी आ । आह्मी घालूं सर्वाठायीं । तुका म्हणे तें ही । तुज वाटे भूषण ॥3


198 भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी  अन्न एकवटा । दे निवडुनी । माते म्हणतो जननी । हात पिटूनि मेदिनी । वरि अंग घाली ॥1 कैसा आळ घेसी । नव्हे तेंचि करविसी । घे दुसरें तयेसी । वारी म्हणे नको ॥ध्रु.॥ आतां काय करूं । नये यासि हाणूं मारूं । नव्हे बुझावितां स्थिरू कांहीं करिना हा । तोंचिं केलें एके ठायीं । आतां निवडूनि खा । आह्मा जाचितोसि का । हरिसि म्हणे माता ॥2 त्याचें तयाकुन । करवितां तुटे भान । तंव जालें समाधान उठोनियां बैसे माते बरें जाणविलें । अंग चोरूनि आपुलें । तोडियलें एका बोलें । कैसें सुखदुःख ॥3 ताट पालवें झाकिलें । होतें तैसें तेथें केलें । भिन्नाभिन्न निवडिलें । अन्नें वेगळालीं । विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं । ह्मणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥4 हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनि बाहे । देती आलिंगन । आनंद भोजनीं । तेथें फिटलीसे धणी । तुका ह्मणे कोणी । सांडा शेष मज ॥5


199 चला वळूं गा । बैसों जेऊं एके ठायीं ॥1 बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु.॥ खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥2 तुका ह्मणे धांवे । मग अवघें बरवें ॥3


200 नेणों वेळा काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥1 नाहीं नाहीं रे कान्होबा भय आह्मापाशीं । वळूनि पुरविसी गा पोटा खावया ॥ध्रु.॥ तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥2 तुका ।बोल । आह्मा अनुभवें फोल ॥3



--: संकलन संतचरणरज श्री शाहू संभाजी भारती :--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यावाद ! लवकरच आपले समाधान होईल.